जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील सावखेडा परिसरात निसर्ग सान्निध्यात असलेले “आश्रय माझे घर ” ही प्रौढ मतिमंद आजन्म सांभाळ करणारी संस्था आहे.येथे जळगाव येथील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल चिन्मय हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉ. राहुल महाजन व डॉ. सोनाली महाजन यांनी सर्व मुलांना वारंवार होणारा सर्दी, खोकला, कफ यापासून संरक्षण म्हणून लसीकरण केले.त्याचप्रमाणे रक्त तपासणी तसेच इतर आरोग्य तपासणी केली. डॉ. राहुल महाजन आणि डॉ.सोनाली महाजन हे नेहमीच “आश्रय “च्या मुलांच्या आरोग्याचीकडे गांभीर्याने लक्ष देत असतात. त्यांना वेळोवेळी टॉनिक देणे, गरजेची औषध देणे, त्यांच्या नाश्ता जेवणात मार्गदर्शन करणे आदींसाठी त्यांच्याकडे नेहमी लक्ष असते. एखाद्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखलची गरज पडल्यास त्यांच्याकडे पूर्ण जातीने लक्ष देणे अशी उत्तम सेवा मुलांना मिळत असते.
त्यांच्याबरोबर त्यांच्या संपूर्ण सहकारी वर्गाचेही तितकेच सहकार्य ‘आश्रय ‘साठी नेहमी लाभत असते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी तसेच संस्थेचे अध्यक्ष भरत अमळकर संचालिका रेखा पाटील व्यवस्थापक योगेश पाटील उपस्थित होते. डॉ. राहुल महाजन व डॉ. सोनाली महाजन हे ” आश्रय माझे घर “चे संचालक सुद्धा आहेत.
” आश्रय माझे घर ” येथे सुमारे 30 मुलं असून त्यांना अनेकविध गोष्टी ,मनोरंजन, प्रार्थना, व्यायाम ,बौद्धिक खेळ,कवायत यासह अनेक बाबी शिकविले जातात. एक उत्तम अशी ही संस्था असून यासाठी संस्थेचे संचालक आणि संचालिका रेखा पाटील ह्या पूर्णतः वैयक्तिक लक्ष देत असतात ,या सामाजिक उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे.