जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी श्री कृष्णा पाटील (क्रिष्णा पेक्टीन्स प्रा.लि.) यांनी स्कूल बस उपलब्ध करून दिली .या स्कूल व्हॅनचा लोकार्पण सोहळा दिनांक 20 ऑक्टोबर रोजी उडान दिव्यांग प्रशिक्षण सेंटर येथे झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्रीकृष्ण पाटील उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवर लालजी संघवी यांची उपस्थिती होती. यावेळी सुप्रीम कंपनी मधील मान्यवर सुरेश मंत्री, रवीजी कोंबळे, महाडिक, सुगंध मुनोत, डॉ गौरव महाजन, रोशन रुणवलं हे उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेतील मुलांनी एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करून कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा पाटील सरांचा वाढदिवस अतिशय वेगळ्या प्रकारे साजरा केला. या स्कूल व्हॅनचा उपयोग तज्ञ मंडळींना घेऊन गावोगावी जाऊन तेथील दिव्यांग मुलांना सेवा प्रदान करण्यासाठी करण्यात येणार आहे.असे उडान च्या संचालिका सौ.हर्षाली चौधरी यांनी याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वाती ढाके यांनी केले तर जयश्री पटेल, ज्योती रोटे, हेतल वाणी, प्रतिभा पाटील, विनोद शिरसाळे रामचंद्र पाटील यांनी कार्यक्रमास पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.