Friday, February 27, 2026
police dakshta logo
Homeक्राईमस्कुटी, मोबाईल चोरी प्रकरणाचा उलगडा.. तिघे आरोपी जेरबंद.. ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त...

स्कुटी, मोबाईल चोरी प्रकरणाचा उलगडा.. तिघे आरोपी जेरबंद.. ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- फिर्यादी गणेश तानाजी गवळी यांची स्कुटी व मोबाईल चोरी झाल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उलगडा करत तीन आरोपींना अटक केली असून सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री गवळी यांची स्कुटी व मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी हाती घेतला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर ना. डोमाळे, हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सायगव्हाण (ता. कन्नड) येथून १) मनोज छोटू मोरे (१९), २) आदित्य बाजीराव वाघ (२१) व ३) विनोद रामदास सौदाणे (१९) यांना ताब्यात घेतले. आरोपी क्रमांक १ मनोज मोरे याला श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथून ताब्यात घेण्यात आले.तपासादरम्यान आरोपींकडून १) HONDA एव्हीएटर स्कुटी (चेसीस क्र. ME4JC21CEJ802748), २) ONE PLUS NORD मोबाईल (IMEI क्र. 865152064259233) तसेच ३) गुन्ह्यात वापरलेली HERO SHINE मोटारसायकल (MH 20 HD 4350) असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अटक करण्यात आलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथे पूर्ण करण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या