जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भाजपा महानगर तर्फे भाजपा जिल्हा कार्यालय (GM फाऊंडेशन) येथे संघटनात्मक मंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, “सेवा पंधरवाडा” महानगर संयोजक विजय वानखेडे उपस्थित होते.
उपस्थितांमध्ये माजी महापौर सीमाताई भोळे, रेखा वर्मा, जयेश भावसार, गोपाल पोपटानी, सचिन बावीस्कर, मंडल अध्यक्ष दिपमाला काळे, मंडल सरचिटणीस विनय केसवानी, सरोजताई पाठक, प्रकाश बालानी, मनोज काळे, गुरबक्ष जाधवाणी, सागर पोळ, सुशील चौधरी, सतीश पाटील, संजय अडकमोल, ऋषिकेश शिंपी, मंगला चौधरी, रत्नाताई बागुल, सुमनताई मराठे, नंदिनीताई राणा, श्याम करमचंदानी, विक्की चौधरी, रोहित वाघ, मनोज सोनवणे, शुचिताताई हाडा यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडल अध्यक्ष दिपमाला काळे, सूत्रसंचालन मंडळ सरचिटणीस विनय केसवाणी आणि आभार प्रदर्शन शुचिताताई हाडा यांनी केले.