विशेष वृत्तांकन मालिका भाग- २
पैसे द्या आणि पुरस्कार घ्या..
जळगाव/ पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात सेवाभावी संस्थांच्या नावाखाली मेवा खाणारे बोगस सेवाभावी संस्थांचा बाजार उठवायलाच हवा असे आता अनेकांना वाटू लागले आहे. समाजात कुठले कार्य, ना कुठलीही सेवा फक्त मिळून मिसळून खाऊ आम्ही जनतेचा मेवा अशी स्थिती आता बोगस सेवाभावी संस्थांनी मांडली आहे. या सेवाभावी संस्था खऱ्या नसून पूर्णपणे खोट्या आहेत. बनावट पुरस्कारांचा बाजार मांडून पैसा उकळण्याचा गोरखधंदा केला असल्याचे नक्कीच उघडकीस येणार आहे.
प्रथम मालिकेत दर्शविल्यानंतर बोगस सेवाभावी संस्थेचे बोगस पदाधिकारी आता सावधगिरी बाळगून तोंडे लपवू लागले आहेत. अशा सेवाभावी संस्थांचे बिंग फुटायला हवे आणि जनतेसमोर उघडे करायला हवे सेलिब्रिटींना समोर आणून चाटूपणा करणारे पुढे -पुढे करणारे हे संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते खोटेनाटे धंदे करत जनतेला लुटण्याचे काम कुठेतरी थांबायला हवे. पण बनावट संस्थांचा डुबलीकेट पुरस्कार घेणारे देखील मला डूप्लिकेट दिसतात, असे काही म्हणायला हरकत नाही. कारण तेही स्वतःचे नाव कमावण्यासाठी ना कुठलं काम, ना कार्य, पैसे देऊन स्वतःचा गौरव करून घेत आहे. पण अशामुळे अनेक चांगली सामाजिक कार्य करणारी माणसे देखील यात रगडली जात आहे.
आता या सेवाभावी संस्थांचा बोजवारा उठायलाच हवा. या संस्था कोणाकोणा पर्यंत कश्या पोहोचतात कशा प्रकारे घडते, आणि आपल्याबद्दल काय काय सांगतात आणि लोकांना बळी पाडतात. सामाजिक सेवा संस्था ही समाज घडविण्याचे समाजिक कार्य करण्याचे काम करीत असते..त्याचे समाजात वेगळ्या प्रकारचे प्रतिबिंब उमटत असते. पण आत्ता या बनावट सेवाभावी संस्थांमुळे चांगल्या सेवाभावी संस्थांची प्रतिमा ढासळतांना दिसत आहे. यासाठी बोगस सेवाभावी संस्थांना चाप द्यायला हवा. आणि याचा खुलासा तर नक्कीच होणार..
सेवाभावी संस्थेचे ना कुठलं काम, पुरस्काराच देण्यासाठी घेतला जातोय ‘दाम’ – विशेष वृत्तांकन मालिका भाग नं- ३
वाचायला विसरू नका पोलीस दक्षता लाईव्ह वर….