नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- स्वयंसंशोध फाउंडेशन, नशिराबाद यांच्या वतीने शहीद दिनानिमित्त ‘वीरांना वंदन, वीरपत्नी सन्मान सोहळा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर वीरांना कृतज्ञ राष्ट्राचा सलाम अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाचा सन्मान करण्याचा हा उपक्रम आहे.मातृभूमीच्या रक्षणासाठी हसत-हसत प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांच्या अदम्य शौर्य, धैर्य आणि अतुलनीय बलिदानामुळेच आज आपण सुरक्षित, स्वाभिमानी आणि स्वतंत्र जीवन जगत आहोत. या शूर सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच त्यांच्या परिवारांनी केलेल्या महान त्यागाचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमात वीर सैनिकांच्या वीरपत्नींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असून, हा सोहळा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून देशभक्ती, त्याग आणि शौर्याला मनापासून केलेला सलाम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.हा अभिमानास्पद व प्रेरणादायी क्षण अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची वेळ व ठिकाण:-
रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता हा कार्यक्रम राणी लक्ष्मीबाई सभागृह, न्य ू इंग्लिश स्कूल, नशिराबाद (ता. जि. जळगाव) येथे आयोजित करण्यात आला आहे. “शहीदांचा त्याग अमर आहे; त्यांच्या कुटुंबाचा सन्मान हा राष्ट्राचा अभिमान आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.

