Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावअमळनेरात १५ ते १९ ऑक्टोबर शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन

अमळनेरात १५ ते १९ ऑक्टोबर शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन

अमळनेर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- अमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ, प्रा. आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय आणि मोफत वाचनालयातर्फे १५ ते १९ ऑक्टोबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे (नागपूर) यांची जाहीर मुलाखत होणार आहे. अमळनेरकरांसह रसिकांसाठी पर्वणी असणारी शारदीय व्याख्यानमाला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे दररोज सायंकाळी ६.३० वाजता होईल. मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर द्वारा आयोजित ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.२, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळेनर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. यापार्श्वभूमीवर शारदीय व्याख्यानमालेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

या व्याख्यानमालेस उपस्थितीचे आवाहन मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रह्मे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारणी सदस्य प्रा. डॉ. पी.बी.भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश महेश्वरी, प्रा.श्याम पवार,स्विकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापुरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या