नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शेंदुर्णी गावात १४ ऑगस्ट रोजी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा विटंबना झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा जाहीर निषेध नशिराबाद येथे बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बौद्ध समाजाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “देशामध्ये सध्या राजकीय आणीबाणी व जातीयवाद वाढत चालला असून त्यामुळे सामाजिक अस्थिरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. या अमानुष कृत्याचा निषेध करतो. ज्याने हा घृणास्पद प्रकार केला आहे, त्या नराधमावर गंभीर गुन्हे नोंद होणे आवश्यक आहे. तसेच या कृत्यामागील सूत्रधार शोधून काढणे गरजेचे आहे, जेणेकरून जिल्ह्याचे वातावरण दूषित होणार नाही.”
या निषेध सभेस शांताराम सोनवणे, रमेश रंधे, श्रावण बिराडे, सतीश सावळे, आनंदा रंधे, तुषार रंधे, सर अनिल देवळे, प्रदीप सुरवाडे, संदीप सुरवाडे, राजू वाघ, यशवंत करडे, दीपक सोनवणे, दीपक सपकाळे, शुभम सपकाळे, किरण सोनवणे, पंकज रंधे, रतन सुरवाडे, संतोष रगडे, रवी रंधे, गणेश रंधे, अभय सपकाळे, विपुल रंधे आदींसह बौद्ध समाजाचे उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, समाजात एकोपा टिकविण्याचे आवाहन केले.