Monday, March 2, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासुनसगाव येथे आगे मोहोळच्या हल्ल्यात चार महिला जखमी!

सुनसगाव येथे आगे मोहोळच्या हल्ल्यात चार महिला जखमी!

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील शेती शिवारात हरभरा कापणीच्या कामाला महिला गेलेल्या असताना अचानक आगे मोहळाच्या मधमाशांनी हल्ला चढवला त्यामुळे चार महिला जखमी झाल्याची घटना घडली.

या बाबत माहिती अशी की ,दि १ मार्च रोजी सकाळी १० वाजता येथील शेतकरी एकनाथ गोविंदा भोळे यांच्या गोजोरा रस्त्यावर असलेल्या गावानजिक च्या शेतात चारुलता एकनाथ भोळे व सोबत गावातील महिला अनिता सतिश पाटील , रंजना रोहिदास पाटील तसेच एक आदिवासी पावरा महिला अशा चौघी जणी हरभरा पिकाची कापणी करीत असताना अचानक आगे मोहोळाच्या मधमाशांनी हल्ला केला त्यामुळे या महिलांनी वाचवा वाचवा म्हणत गावाकडे पळ काढला मात्र मधमाशा पिश्चा सोडत नसल्याने दंश झालेल्या भागात आग होत असल्याने महिलांनी पाण्याच्या हौदात उतरुन बचाव करण्याचा प्रयत्न केला तरीही मधमाशांनी हल्ला सुरूच ठेवला त्यामुळे या सर्व महिला जखमी झाल्या यात शेतमालक चारुलता एकनाथ भोळे या गंभीर जखमी झाल्या ताबडतोब ग्रामस्थांनी गावातील दवाखान्यात दाखल करुन उपचार केले आता सर्व जखमी महिलांची तब्येत ठीक असल्याचे सांगितले आहे.

शेताशिवारात जाताना शेतकरी तसेच शेतमजूर यांनी आगे मोहोळ पासून काळजी घ्यावी असे यावेळी बोलले जात होते.जखमींवर डॉ.सागर धनगर यांनी उपचार केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या