Friday, November 22, 2024
police dakshta logo
Homeक्राईमरवंजे बुद्रुक येथे शेतातील वाट-वहिवाट वरून वाद; कोयत्याने केलेल्या हल्ल्यात एक गंभीर;आरोपी...

रवंजे बुद्रुक येथे शेतातील वाट-वहिवाट वरून वाद; कोयत्याने केलेल्या हल्ल्यात एक गंभीर;आरोपी फरार..

ठार मारण्याच्या उद्देशानेच माझ्यावर कट रचला : रामकृष्ण कोळी.

हाणामारी नंतरचा व्हिडिओ 👇👇👇

 

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- वडिलोपार्जित वाट-वहिवाट (रस्ते ) वरून शेतातील पीक उत्पादन काढत असताना वाद विकोपाला गेल्याने एकास त्याच्या भाऊबंदांनी म्हणजे काका चुलत्यांनी जीवे ठार मारण्याच्या हेतूने कोयत्याने डोक्यावर,हातावर जोरदार हल्ला चढवीत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली .यात गंभीर झालेला व्यक्ती सुदैवाने वाचला असून त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेतातील वडिलोपार्जित वाट-वहिवाट वादाचे रूपांतर हाणामारीत..

दरम्यान या घटनेची सविस्तर माहिती अशी की, रवंजा बुद्रुक ( ता.एरंडोल ) येथील शेतात वडिलोपार्जित वाट-वहिवाट ( रस्ते ) वरून शेतातील पीक उत्पादन काढत रामकृष्ण देवराम कोळी यांच्याशी त्याचे काका व चुलते विठ्ठल चिंतामण कोळी,शिवाजी चिंतामण कोळी,विशाल विठ्ठल कोळी,ज्ञानेश्वर विठ्ठल कोळी,सुरेखा विठ्ठल कोळी आणि इंदूबाई शिवाजी कोळी यांनी संगनमताने एकत्र येऊन रामकृष्ण कोळी यांच्याशी वाद घातला.वाद सुरू असताना हमरीतुमरी होऊन मारण्याच्या उद्देशाने रामकृष्ण कोळी यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करत लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण करून गंभीर जखमी केले.
काहीवेळातच रामकृष्ण यांच्या घरातील सदस्यांना ही बाब कळली असता ग्रामस्थांच्या मदतीने खासगी वाहनाद्वारे त्यांनी जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून फिर्यादी रामकृष्ण कोळी यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहे.

ठार मारण्याच्या उद्देशानेच माझ्यावर कट रचला – रामकृष्ण कोळी

” मला जीवे ठार मारण्याच्याच उद्देशाने माझ्यावर हा पूर्व नियोजित कट रचला ” असल्याचे रामकृष्ण देवराम कोळी यांनी यांनी पोलिसांशी बोलताना फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी फिर्यादीचा जाबजबाब नोंदवून घेतला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या