जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालय (संचालित – शिक्षण प्रसारक मंडळ) येथे गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, पर्यवेक्षक संजय वानखेडे तसेच पर्यवेक्षिका रमा तारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी पद्मजा जोशी व आनंद पाटील यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिवचरित्राची माहिती दिली. पांडूरंग सोनवणे यांनी “अमुचे दैवत छत्रपती” हे गीत सादर केले.विद्यार्थ्यांपैकी कनिष्का ठाकरे, जगदीश शिंपी, विनय पाटील, खुशी पाटील, प्रज्ज्वल साळुंखे, श्रद्धा पाटील, ईशा गवळी, प्रसाद जैन, निरंजन डांबरे, विवेक नाथजोगी, सचिन पंडीत, योगेश पाटील व केतन कपाटे यांनी भाषण, कथा, पोवाडा व गीत सादर केले.समूहगीत सादरीकरणात कृष्णा तांबट, गौरव साबळे, कृष्णा शर्मा, कार्तिक राठोड, लोकेश घुगे व उदय भालेराव सहभागी झाले. यावेळी सम्बळ वादनावर दुर्गेश सराफ यांनी साथ दिली. तर लावण्या निंबाळकर यांनी “माय भवानी” हे नृत्य सादर केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांचे आदर्श गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता पानट यांनी तर आभार प्रदर्शन मनिषा पवार यांनी केले. सूत्रसंचालन टिशा नेहेते यांनी केले.जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित प्रभात फेरीत शिक्षक प्रणित येवले यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत घुगे, स्मिता करे, योगेश सोनजे, यमिनी चौधरी, जागृती मोराणकर, पंकज महाले व संपदा तुंबडे यांनी सहकार्य केले.

