जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी समर्थ रामदास स्वामी यांची जयंती (दासनवमी) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्येची देवता सरस्वती देवी तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, ज्येष्ठ शिक्षिका मंगला भारुळे, रोहिणी प्रचंड, ए. डी. पाटील, श्रीमती योगिता तडवी,संपदा तुंबडे, संगीता पानट, रेवती किन्हीकर, स्मिता करे, मयूर पाटील, योगिता महाजन तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
मान्यवरांच्या स्वागतानंतर मंगला भारुळे व स्मिता करे यांनी समर्थ रामदास यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग गोष्टीरूपाने विद्यार्थ्यांसमोर मांडले.संपदा तुंबडे यांनी समर्थ रचित ‘आरंभी वंदिन अयोध्येचा राजा’ हा अभंग सादर केला. तसेच ‘मनाचे श्लोक’ या आदर्श नैतिक मूल्यांचा संदेश देणाऱ्या रचनांचे पठण संपदा छापेकर व संगीता पानट यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतले, तर त्या श्लोकांचा अर्थ सुनीता रोटे यांनी स्पष्ट केला.मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी समर्थांच्या शिकवणुकीतून विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयाच्या मूल्यांबाबत मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांनी सज्जनगड येथे नेलेल्या शालेय सहलीच्या आठवणी सांगत समर्थांच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगिता तडवी व रोहिणी प्रचंड यांनी केले, तर सूत्रसंचालन योगिता महाजन व कु. तिषा नेहेते यांनी केले. रेवती किन्हीकर यांनी ‘उत्तम पुरुषाची लक्षणे’ याविषयी मार्गदर्शन केले.शाळेचे पदाधिकारी, मार्गदर्शक, इयत्ता पाचवी व नववीचे वर्गशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने दासनवमीचा कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.

