Monday, September 16, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याशेतकऱ्यांना लाभ होणार; किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्यासाठी केंद्र शासन...

शेतकऱ्यांना लाभ होणार; किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध

दिल्ली/पोलीस दक्षता लाईव्ह:-  किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या बाजूने हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. सध्या केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी अंतर्गत खरेदी वाढविण्याचा विचार केला जात आहे. ज्यामुळे ग्रामीण उत्पन्नात कोणतीही घट होणार नाही. मुख्य म्हणजे या संबंधित प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडण्यात आला आहे. जर या प्रस्तावाला पंतप्रधानांकडून मंजुरी मिळाली तर या योजनेत 20,000-30,000 कोटी रुपयांची वाढ होईल. अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी कधी करण्यात येईल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र येत्या आगामी निवडणुकांच्या काळात सरकारकडून योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय होऊ शकतो. या वर्षाच्या अखेरीस राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील विधानसभा निवडणुका पार पडतील. त्यामुळे या काळात सरकार योजनेच्या निधीत वाढ करू शकते.दरम्यान, केंद्र सरकारने निवडणुकांच्या अगोदर किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ केली तर त्याचा चांगला फायदा निवडणुकीमध्ये होऊ शकतो. मध्यप्रदेश मध्ये एकूण राज्य देशांतर्गत उत्पादनात शेतीचे योगदान 40 टक्के आहे. त्याचबरोबर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये ते सुमारे 27-27 टक्के आहे. पुरेशी लोकसंख्या असलेल्या या राज्यांमध्ये जर सरकारने योजनेची रक्कम वाढवली, तर या राज्यांच्या कृषी लोकसंख्येवर परिणाम होऊ शकतो.त्यामुळे सरकार लवकरच या योजने संबंधित एक मोठा निर्णय घेऊ शकते. सध्या, राज्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या जुलै महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. ज्याचा शेतकऱ्यांना सर्वात मोठा फायदा होतो. जर आगामी निवडणुकांचा विचार करून सरकारने या रकमेत वाढ केली तर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दुप्पट फायदा मिळू शकणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या