Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावसरकारचे शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष नाही'. भाजप पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण करण्यात व्यस्त; सीबीआय,...

सरकारचे शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष नाही’. भाजप पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण करण्यात व्यस्त; सीबीआय, ईडी, खोटे खटले दाखल करायचे काम केले: शरद पवार

जळगाव/तुषार वाघुळदे कार्यकारी संपादक/पोलीस दक्षता लाईव्ह: –जळगावात आज राष्ट्रवादी नेत्यांची सभा झाली.माजी केंद्रीय संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज जळगावमध्ये सागर पार्कवर झालेल्या सभेला संबोधित करताना भाजपवर टीका केली.’शेतकरी भीक नाही कष्टाची किंमत मागत असतो . पण, सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही ‘. भाजप पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण करत आहे. शिवसेनाही फोडली असे सांगून जोरदार टीकास्त्र सोडले.सत्तेचा गैरउपयोग होत आहे, असं म्हणत काही कारण नसताना मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. स्त्रियांना जखमी करण्यात आले.अनेकांची वाताहत झाली. लहान मुलांना मारहाण करण्यात आली, असं म्हणत त्यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केले.शरद पवार यांच्या उपस्थितीत सागर पार्क येथे ‘ स्वाभिमानी ‘ सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आ. रोहित पवार, माजी मंत्री आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतिष पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यासह आदी उपस्थित होते.या सभेत शरद पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 9 वर्षांपासून सत्तेत आहेत. भाजपचं 9 वर्षांपासून सत्तेत आहे. पण भाजपने काय केलं? असा सवाल शरद पवार यांनी यावेळी केला. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली.

आज काय चित्र दिसतंय? मोदी साहेबांचं राज्य आहे. मोदी साहेबांनी काय केलं? 9 वर्ष झाली. इतर राजकीय पक्ष फोडणे. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, फोडाफोडीचं राजकारण, एवढी एकच गोष्ट केली. दुसऱ्या बाजूने आपल्या हातात जी सत्ता आहे ती लोकांसाठी वापरायची. त्याच्याऐवजी सीबीआय, ईडी, खोटे खटले दाखल करायचे. काही संबंध नसताना काही महिने तुरुंगात टाकण्याचं काम केलं”, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी केला.“नवाब मलिक जुने नेते आहेत. त्यांना तुरुंगात टाकली. लोकांनी दिलेली सत्ता ही त्यांना सन्मानाने जगता कशी येईल यासाठी वापरायची असते. पण त्याऐवजी आज सत्तेचा गैरवापर भाजपने केलेला आहे”, असं शरद पवार म्हणाले. सभा सुरू असताना मध्ये मध्ये काही प्रेक्षक उठून गोंधळ घालत होते. उन्हाचाही चटका अनेकांना जाणवला. आभार जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या