Tuesday, September 16, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याकृषीकन्यांकडून शेतकऱ्यांना फळबाग व्यवस्थापनाचे सविस्तर मार्गदर्शन

कृषीकन्यांकडून शेतकऱ्यांना फळबाग व्यवस्थापनाचे सविस्तर मार्गदर्शन

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर आयोजित ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नशिराबाद येथे कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून फळबाग व्यवस्थापनाचे सखोल मार्गदर्शन केले.

बागायती पिकांच्या यशस्वी उत्पादनासाठी योग्य खड्डे खोदणे, योग्य खतांचे नियोजन, व रोगप्रतीबंधक उपाययोजना या बाबींचे महत्त्व लक्षात घेता ‘फळबागांचे व्यवस्थापन’ या विषयावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. कृषीकन्यांनी खड्ड्यांचे अचूक माप, खड्डा खोदण्याची शास्त्रशुद्ध पद्धत, सेंद्रिय व रासायनिक खते वापरण्याचे प्रमाण, तसेच खते देण्याची रिंग पद्धत याचे सविस्तर प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले.या उपक्रमात कृषीकन्या आदिती चिंचोली, वैशाली भोई, वैष्णवी केकाणे, पुनम पवार, स्नेहा बनसोडे व संजीवनी घोरपडे यांनी सहभाग घेतला. उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करताना उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी महाविद्यालय मुक्ताईनगरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, कृषी जागरूकता कार्यक्रमाचे चेअरमन डॉ. दत्तात्रय पाचारणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बाळासाहेब रोमाडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सागर बंड तसेच संबंधित विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या