Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याअधिकाऱ्याचे अपमानजनक वर्तन; शिक्षक संघटनांकडून चौकशीची मागणी

अधिकाऱ्याचे अपमानजनक वर्तन; शिक्षक संघटनांकडून चौकशीची मागणी

जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागातील वेतन पथकात एका प्राथमिक शिक्षकाने आपल्या वेतनाशी संबंधित अडचण घेऊन भेट दिली असता, अधीक्षिका श्रीमती आर. बी. संधानशिवे आणि लिपिक सुनील मोरे यांनी संबंधित शिक्षकाशी असभ्य व अपमानजनक वर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे.

शिक्षकाने कोणतीही आक्षेपार्ह टीका न करता केवळ आपली सेवा माहिती मागवली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी संतुलन हरपून शिक्षकाला अयोग्य भाषेत उत्तर दिले. या प्रकारामुळे शिक्षक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या घटनेचा व्हिडिओ काही शिक्षक वर्तुळात सध्या व्हायरल झाला आहे. यामधील वर्तन हे महाराष्ट्र सिव्हिल सेवा (वर्तणूक) नियम, 1979 च्या नियम 3(1)(iii) – “कर्मचाऱ्याने सभ्य व नम्र वर्तन करावे” – याच्या सरळ विरोधात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे. “अधिकाऱ्यांकडे अडचणी घेऊन गेल्यास अपमान सहन करावा लागतो का?” असा सवाल आता शिक्षक समुदायातून उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या