जामनेर रस्त्यावर अरिहंत जिनिंगसमोर भीषण अपघात; पाच जण जखमी
बोदवड | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शिरसाळा मारोती येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची अॅपे रिक्षा जामनेर रोडवरील अरिहंत जिनिंगसमोर पलटी झाली. या दुर्घटनेत एक तरुण जागीच ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
मयत योगेश ज्ञानदेव मंगळकर (वय २८, रा. नवेदाभाडी, ता. जामनेर) हे आपल्या कुटुंबियांसह दर्शनासाठी शिरसाळा मारोती येथे जात असताना MH 19 BU 4607 क्रमांकाच्या अॅपे रिक्षाला अपघात झाला. हा अपघात इतका गंभीर होता की अपघातात मंगळकर गंभीर जखमी झाले होते. त्यांना जळगाव येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये उषाबाई ज्ञानदेव मंगळकर (५०), नवेदाभाडी, रामदास राजाराम गोरे (९०), जामठी, धर्मेश गोरख बच्छाव (३२), संगमनेर, दिवाकर भास्कर नेवाड (२१), नवेदाभाडी उज्ज्वला युवराज राऊत (३५) बऱ्हाणपूर, या सर्व जखमींवर बोदवड ग्रामीण रुग्णालयात डॉ. योगेश राणे व डॉ. यासिर खान यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. बोदवड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.