‘आरटीओ’ ने डंपर चालकांवर कारवाई करण्याची मागणी..
जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- गेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीत जळगाव शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी अपघात मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. भरधाव डंपरने क्रूझरला दिलेल्या धडकेत तीन ठार झाले आहेत.तर चार जर जखमी झाले आहेत. आज सकाळी हा अपघात राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी पुलाजीक जवळ घडला. मध्य प्रदेशातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे शिवलींग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने क्रूर झडप घातल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिवलिंग घेण्यासाठी ओंकारेश्वरला जाणार्या भाविकांच्या गाडीला भरदार वेगाने येणार्या वाळूच्या डंपरने उडवल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. जळगाव शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या बांभोरीजवळ हा भीषण अपघात झाला आहे.मृत झालेल्यांमध्ये विजय चौधरी (४०), तुषार जाधव (२८) आणि भूषण खंबायत (३५, सर्व राहणार साई नगर, जळगाव ) यांचा समावेश आहे. तर या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जळगावातील साईनगर भागात शिव मंदिर बांधण्यात आले आहे, या मंदिरातील शिवलिंग घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहा वाजता क्रुझर गाडीने ओंकारेश्वरला निघाले होते. मात्र घरापासून अवघ्या पाच मिनिटांचा अंतरावरच बांभोरी गावाजवळ समोरून येणार्या डंपरने क्रुझरला दिलेल्या जोरदार धडकेत, भीषण अपघात झाला. त्यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन मृतदेह जिल्हा रूग्णालात पाठविले आहेत. दरम्यान खोटेनगर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.डंपरमुळे अपघात वाढत असून याकडे आरटीओ विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.