Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावशिवमहापुराण कथेसाठी जळगाव जिल्हा- तालुका समिती स्थापन ; स्वयंसेवक नोंदणीसाठी नियोजन बैठक...

शिवमहापुराण कथेसाठी जळगाव जिल्हा- तालुका समिती स्थापन ; स्वयंसेवक नोंदणीसाठी नियोजन बैठक २८ जुलैला

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात ४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान नशिराबाद येथील दूरदर्शन टॉवर मागील पटांगणावर श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला प्रारंभ होणार आहे. या भव्य धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये स्वयंसेवकांची नोंदणी आणि तालुका समित्या स्थापन करण्यासाठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या नियोजन बैठकीसाठी दिनांक २८ जुलै २०२५ रोजी, पहिल्या श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर, तरसोद गणपती मंदिर संस्थान येथे दुपारी १ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत दुपारी १ ते ३ या वेळेत स्वयंसेवक नोंदणीसाठी फॉर्म भरले जातील तसेच तालुका समित्यांचे गठन केले जाईल.स्वयंसेवकांनी फॉर्म भरताना आधार कार्डची झेरॉक्स व दोन पासपोर्ट साइज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. हे कागदपत्र नसल्यास फॉर्म स्वीकारला जाणार नाही. तसेच फॉर्म घरी नेण्याची परवानगी देण्यात येणार नाही. यापूर्वी ज्यांनी तरसोद गणपती मंदिरावर फॉर्म भरले आहेत, त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

या बैठकीस जळगाव जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना तसेच संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुंदकेश्वर शिवमहापुराण कथा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जळगाव शिवपुराण कथेचे आयोजक:
सौ. ममताताई श्रीकांत बोढरे अध्यक्ष, कुंदकेश्वर शिवमहापुराण कथा सेवा समिती, जळगाव.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या