नशिराबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- मंगळवार दि. 9 एप्रिल रोजी सुरु असलेला पवित्र सण रमजानचे औचित्य साधत व हिंदू मुस्लिम एकता निरंतर राहावी या उद्देशाने शिवसेना उ.बा.ठा. नशिराबाद शहर व स्वराज्य जननी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इफ्तार पार्टीचे आयोजन ॲड.नेमचंद मोतीलाल येवले शिवसेना (उ.बा.ठा.) उपशहर प्रमुख नशिराबाद व मोहित रमेश येवले युवासेना(उ.बा.ठा.) शहर संघटक नशिराबाद, अध्यक्ष, स्वराज्य जननी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे करण्यात आले होते.
याप्रसंगी नमाज पठण झाल्यानंतर हिंदू मुस्लिम समाजातील गोर गरीब मुले यांच्या समवेत दोघी समाजातील बांधवांनी रोजा सोडत इफ्तार पार्टीचा आनंद लुटला व नशिराबाद शहर मध्ये या निमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचे उत्तम उदाहरण पहावयास मिळाले. तसेच महिला साठी घरपोच फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी शिवसह्याद्री प्रतिष्ठान नशिराबादचे अध्यक्ष गणेश भाऊ चव्हाण, मोसिम पिंजारी, समाजसेवक दिपक बोंडे, बंडू रत्नपारखी, मोतीलाल येवले, कमलाकर रंधे, शरीफ पैलवान, दिलीप नारखेडे, सगीर खाटकी, दगडू माळी, फिरोज पिंजारी आदी समाज बांधवांची उपस्थिती होती.
इफ्तार पार्टी यशस्वी होण्यासाठी आरिफ पिंजारी,अज्जू पिंजारी, दिपक कोळी, आकाश अहिरे, शाकीर पिंजारी, अन्वर पिंजारी, सागर भिल, जहीर पिंजारी, शोएब पैलवान, बबलू पैलवान, मुन्ना पैलवान, सलीम पैलवान यांचे सहकार्य लाभले.