दहावीच्या परीक्षेत नशिराबादची सायली जाधव श्रवण कम्प्युटर्स अँड क्लासेसची विद्यार्थिनी न्यू इंग्लिश स्कूलमधून 87.60 गुणांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण..
नशिराबाद/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरातील इयत्ता दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा श्रवण कम्प्युटर्स अँड क्लासेसतर्फे सन्मान करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल, ए. टी. झांबरे विद्यालय, सर्वोदय माध्यमिक विद्यालय आदी शाळांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा या गौरव सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात हरीश पाटील सरांच्या प्रास्ताविकाने झाली. यानंतर नशिराबादचे माजी सरपंच पंकजभाऊ महाजन यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे गणेशभाऊ चव्हाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे, चंदन पाटील, डॉ. दीपक लोखंडे, राजुभाऊ पाटील, महेश माळी यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन प्रा विश्वनाथ महाजन सरांनी केले.
सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांमध्ये सायली जाधव, गायत्री आमोदकर, अनुष्का कोष्टी, देवयानी माळी, रोहिणी भोई, ईश्वर शिंदे, चैताली माळी, धनश्री कुंभार, यज्ञेश आमोदकर आणि केतकी आमोदकर यांचा समावेश होता. सायली जाधव हिने न्यू इंग्लिश स्कूलमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत विशेष यश संपादन केले. ती श्रवण क्लासेसची विद्यार्थिनी असून आपल्या मनोगतात तिने सांगितले.
विद्यार्थिनी सायली जाधव हिचे मनोगत….”सर रोज आम्हाला लवकर उठायला सांगायचे आणि सकाळी प्रश्नपत्रिका सोडवायला लावायचे. यामुळे अभ्यासाची नियमित सवय लागली. मी अबॅकसच्या सर्व आठ पातळ्या पूर्ण केल्या असून त्याचा मला गणित विषयात खूप फायदा झाला.”
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या यशात मोलाची भूमिका बजावली असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि सुयोजित नियोजनामुळे श्रवण क्लासेसच्या या उपक्रमाचे नशिराबाद परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.