Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याश्री.अधाई मूधाई माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा ; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ..!

श्री.अधाई मूधाई माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा ; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ..!

भडगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- आमडदे ता.भडगाव येथे ५२ कुलांची श्री कुलस्वामिनी १५० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पुरातन अशा उंच शिखरावर वसलेल्या आई अधाई मुधाई माता मंदिरात तीन दिवसीय प्राण प्रतिष्ठा सोहळा शास्त्रोक्त पद्धतीने वेद मूर्ती संजय पाठक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने थाटामाटात झाला. दि .१९ फेबूवरी रोजी स्थानिक व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी तसेच परिसरातील गावकऱ्यांनी हजारोच्या संख्येने या महाआरती आणि दर्शन सोहळ्याला उत्साहाने उपस्थिती देवून सुमारे शेकडो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

दि .१६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान आमडदे येथे रेणुका माता चॅरिटेबल ट्रस्ट तसेच आमडदे वलवाडी,ग्रामस्थ मंडळी यांच्या आयोजन समिती द्वारे या धार्मिक उपक्रमाचे आयोजन उत्साही वातावरणात करण्यात आले होते.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे प्रभावी नियोजन सुनील भंगाळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते .या नव्याने जीर्णोद्धार करण्यात आलेल्या कुलस्वामिनी स्थानाचा चेहरा बदलवून भक्तासाठी नवनवीन सुविधा तेथे निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.अभियंता शिवाजी भंगाळे यांच्या देखरेखीखाली व मार्गदर्शनाने नवीन सभा मंडपाचे बांधकाम स्व.गणपत दगडू भंगाळे यांच्या इच्षेनुसार त्यांचे स्मरणार्थ भंगाळे परिवारातर्फे करण्यात आले आहे. इतर बांधकाम लोकवर्गणीतून करण्यात आले आहे. यात पुढील काळात बाहेर गावावरून आलेल्या भाविक भक्तासाठी निवासाची व्यवस्था देखील उभारण्याचा ट्रस्टचा मानस आहे त्या दृष्टीने ह्या कार्यासाठी नियोजन केले जात आहे.

या निसर्गरम्य पवित्र स्थळी नूतन बांधकाम तसेच रंगकाम , मूर्ती स्थापन करण्यात आल्याने उंच शिखरावरील हे स्थान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.देवी भक्ता मध्ये यामुळे उत्साहाची लाट पसरली आहे.दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या रोज वाढत आहे.
केमिस्ट संघटनेतर्फे देखील या महाप्रसाद कार्यक्रमात मोठ्या संख्यने प्रसाद वितरण सेवेत उत्सुर्त सहभाग घेवून आलेल्या भाविक भक्तांची सेवा केली.

या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्यकामी आमाडदे आणि वलवाडी ग्रामस्थांसह रेणुका माता चॅरिटेबल ट्रस्ट चे सुनील भंगाळे, शिवाजी भंगाळे,भागवत भंगाळे, विष्णू भंगाळे,सागर भंगाळे, दिगंबर भंगाळे, पंकज पाटील, जितेंद्र भंगाळे, प्रवीण भंगाळे, निळू भंगाळे न्हावी, विजय खाचणे, भुसावळ, यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या