Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावछत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात योग दिन साजरा

छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात योग दिन साजरा

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव बांभोरी येथील श्री मंगलमूर्ती बहुद्देशीय क्रीडा मंडळ संचलित छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालय व छत्रपती राजर्षी शाहू आय. टी. आय. येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविंत शिवाजी पाटील यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक करून योगशिक्षण आरोग्यासाठी कसे महत्त्वपूर्ण आहे याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक व प्राध्यापक वृंद यांनी योगासने केलीत. या कार्यक्रमास छत्रपती राजर्षी शाहू आय. टी. आय. चे प्राचार्य कुंदन पाटील, तसेच प्रा. माधुरी पाटील, प्रा. डॉ. विश्वनाथ महाजन, प्रा. डॉ. जगदीश निमकर, प्रा. लता परदेसी, प्रा. विजय भोई, प्रा. शांताराम वाघ, प्रा. परमेश्वर महाजन, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. प्रशांत कोळी, योगेश खैरनार, सागर मोरे, कैलास धनगर व विद्यार्थी शिक्षक व आदी उपस्थित होते.

यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लता परदेसी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. माधुरी पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या