जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जयदुर्गा प्राथमिक-माध्यमिक विद्यालय व कै.कौतीक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे आज रोजी मोठ्या उत्साहाने ढोल ताश्याच्या गजरात श्री गणेशाचे आगमन झाले. यावेळी पर्यावरण पूरक अशा शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना माजी महापौर (जळगाव शहर ) सौ.जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी संस्थेचे सचिव ललितभाऊ धांडे तसेच विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका ज्योती इंगळे (मॅडम) व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर कोल्हे सर उपस्थित होते. त्याचबरोबर श्रींच्या स्वागतासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून लेझीम व झांज पथकाच्या माध्यमातून कलाकृती सादर केल्यात. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.