Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याश्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे श्रावणी सोमवार निमित्त दीपोत्सव व महाआरती...

श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे श्रावणी सोमवार निमित्त दीपोत्सव व महाआरती…

चांदवड/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-चांदवड येथील प्रसिद्ध प्राचीन चंद्रेश्वर गडावरील श्री चंद्रेश्वर महादेव मंदिरात सालाबाद प्रमाणे सोमवार , दिनांक – ५ ऑगस्ट २०२४ प्रथम श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात आज पहाटे श्री चंद्रेश्वर महादेव महाअभिषेकाने श्रावण मास शुभारंभ करण्यात आला. तसेच सायंकाळी ०७ वाजता दीपोत्सव व विशेष महाआरतीने भाविक मंत्रमुग्ध झाले. महाआरतीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. श्रावण महिन्यातील चंद्रेश्वरगडावरील निसर्ग , हिरवळ , धूके , पावसाळी निर्झर , धबधबे पाहुन भाविक भक्तांना दीव्य आनंदाची अनुभूती मिळत आहे. पहाटे ०३ वाजेपासून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या