Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रसिंधुदुर्ग किल्ल्याचं पर्यटकांना आकर्षण; प्रवासी वाहतूक होडीद्वारे सुरू..!

सिंधुदुर्ग किल्ल्याचं पर्यटकांना आकर्षण; प्रवासी वाहतूक होडीद्वारे सुरू..!

सिंधुदुर्ग / विशेष प्रतिनिधी – सिंधुदुर्ग किल्ल्याचं पर्यटकांना नेहमी आकर्षण असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाण्यातला किल्ला म्हणून त्याची ओळख आहे. चारही बाजूने समुद्राच्या पाण्याचा वेढा असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक तसेच शिवप्रेमी मुंबई, पुणे, कोल्हापूर, गुजरात, गोवा, कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणावर येत असतात. मात्र पावसाळी हंगामात सुरक्षेच्या दृष्टीने या किल्यापर्यंत होणारी प्रवासी होडी सेवा बंद ठेवण्यात येते. ही प्रवासी वाहतूक होडी सेवा आता १ सप्टेंबरपासून नव्या पर्यटन हंगामास सुरुवात झाली आहे. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार असल्यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा आता संपली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग किल्याच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले आहे. किल्याचा महादरवाजा, दिंडी दरवाजा, ढासळलेली तटबंदी आणि त्यावरील पायवाट, किल्ल्यावरील पायवाटा आदी कामांची प्रामुख्याने दुरुस्ती होणार आहे. तटबंदीवरील झाडी सफाईचे काम लवकरच हाती घेतले गेले आहे. अशी माहिती पुरातत्व विभाग अधिकारी वैभव बेटकर यांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या