Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावसबजेलमधील आरोपीला भेटण्यासाठी लाच घेताना दोन महिला पोलीस व सुभेदार यांना एसीबीने ...

सबजेलमधील आरोपीला भेटण्यासाठी लाच घेताना दोन महिला पोलीस व सुभेदार यांना एसीबीने  पकडले रंगेहाथ.. !!

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-जळगाव येथील जिल्हा कारागृहाचा गलथान कारभार नेहमी चव्हाट्यावर आल्याचे अनेकवेळा घडले आहे.या सबजेलची चर्चा राज्यभर झाली आहे.कैदी पळून जाणे,मारहाण होणे अशा घटना घडल्या आहेत.आरोपींना भेटण्यासाठी प्रवेशद्वारवरील पोलीस पैसे घेत असतात.. अशी तक्रार अनेक आरोपींच्या नातेवाईकांनी याआधीही केली आहे.गंभीर गुन्ह्यात असलेल्या संशयित आरोपीला भेटण्यासाठी २ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या सुभेदारसह दोन महिला पोलिसांना धुळे येथील रंगेहात पकडले आहे.ही कारवाई बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुभेदार भीमा उखर्डू भिल, महिला पोलीस पूजा सोपान सोनवणे आणि हेमलता गैबू पाटील असे अटक केलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.

या संदर्भात अधिकृत माहिती अशी की, तक्रारदार महिला ह्या पहूर येथील रहिवासी आहे. त्यांचा मुलगा हा एका गंभीर गुन्ह्यात जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान मुलाला भेटण्यासाठी आलेल्या तक्रारदार महिला यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी करत भेटून देण्याचे सांगितले जात होते. याच अनुषंगाने मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी तक्रारदार महिला मुलाला भेटण्यासाठी जिल्हा कारागृहात आल्या होत्या.त्यावेळी कार्यरत असलेले सुभेदार भीमा भिल, महिला पोलीस पूजा सोनवणे,हेमलता पाटील यांच्यासह इतर जणही होते.
त्यावेळी मुलाला भेटण्यासाठी महिलेकडून दोन हजारांची मागणी केली होती.इतर आरोपींच्या नातेवाईकांकडून सुद्धा पोलिसांनी पैसे घेतलेले आहेत.

दरम्यान तक्रारदार महिला यांची परिस्थिती हालाखीची आहे,त्या पैसे देवून शकत नव्हते. त्यांनी थेट धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यानुसार पथकाने बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी सापळा रचला. त्यावेळी ड्युटीवर असलेले महिला कारागृह पोलीस पूजा सोनवणे, हेमलता पाटील यांनी सुभेदार भीमा उखर्डू बिल यांच्या सांगण्यावरून तक्रारदार महिलेकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी धुळे पथकाने रंगेहात पकडले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

दरम्यान या घटनेमुळे जिल्हा कारागृह पुन्हा चर्चेत आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या