Saturday, March 7, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासुनसगाव येथे आगे-मोहळच्या मधमाशांचा हल्ला ; सुनसगाव येथे एक जखमी

सुनसगाव येथे आगे-मोहळच्या मधमाशांचा हल्ला ; सुनसगाव येथे एक जखमी

सुनसगाव (ता. भुसावळ) | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- सुनसगाव येथे आगेमोहळच्या मधमाशांच्या हल्ल्याची आणखी एक घटना घडली असून यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी पंढरीनाथ चांगो कंखरे (धनगर) हे बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी शेताच्या शिवारात बेलव्हाळ रस्त्याने जात असताना अचानक आगेमोहळच्या मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ते बेसावध झाले असून मधमाशांनी त्यांच्या चेहऱ्यावर व पाठीवर डंख मारल्याने ते जखमी झाले.जखमी पंढरीनाथ कंखरे यांच्यावर सुनसगाव येथील डॉ. सागर धनगर यांनी उपचार केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, यापूर्वी १ मार्च रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सुनसगाव येथील चार महिलांवरही आगेमोहळच्या मधमाशांनी हल्ला करून त्यांना जखमी केले होते. अवघ्या सहा दिवसांच्या कालावधीत मधमाशांच्या हल्ल्याची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकरी व शेतमजुरांनी शेतात जाताना सावधगिरी बाळगावी, अशी सूचना स्थानिक स्तरावरून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या