Sunday, March 29, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासुनसगावात भटक्या कुत्र्यांचा हल्ला; वृद्ध महिला गंभीर जखमी

सुनसगावात भटक्या कुत्र्यांचा हल्ला; वृद्ध महिला गंभीर जखमी

भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील सुनसगाव येथील श्री खंडेराव मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुनसगाव येथील रहिवासी चंद्रभागाबाई चावदस पाटील (वय ७६) या आपल्या घराजवळून जात असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने मागून येत त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीला चावा घेतला. कुत्र्याने दोन ते तीन वेळा हल्ला केल्याने त्यांच्या पायाला गंभीर जखमा झाल्या.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना गावात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.दरम्यान, सुनसगाव परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गल्लोगल्ली कुत्र्यांचे घोळके दिसत आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या