Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावतहसीलदार डॉ.शीतल राजपूत यांनी स्वीकारला कार्यभार ; शिस्तबद्ध असल्याचा आला प्रत्यय...!

तहसीलदार डॉ.शीतल राजपूत यांनी स्वीकारला कार्यभार ; शिस्तबद्ध असल्याचा आला प्रत्यय…!

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- प्रशासनात अनेक महिला अधिकाऱ्यांनी अत्यंत सक्षमपणे व शिस्तबद्धपणे आपला पदभार सांभाळला आहे.महिला अधिकारी ” एक पाऊल पुढेच ” असेच म्हटले जाते. जळगाव येथे नव्याने बदलून आलेल्या तहसीलदार डॉ.शीतल राजपूत यांनी आज दुपारी 2:45 च्या सुमारास आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. शासकीय गाडी क्रमांक एम.एच. 19 इ.ए. 9558 यातून त्या उतरल्या आणि तहसीलदार कॅबिनमध्ये आत शिरताना दरवाजाच्या उंबरठाचा खाली वाकून विनम्रपणे नमस्कार केला.आणि खुर्चीवर जाऊन स्थानापन्न झाल्या.

तहसीलदार डॉ.शितल राजपूत यांच्या कडक शिस्तीचा पहिल्याच दिवशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आला प्रत्यय.

जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांची अलीकडेच बदली झाली होती. यानंतर त्यांच्या जागी फुलंब्री येथून डॉ.शीतल राजपूत यांची बदली झाल्याचे शासकीय आदेश जारी करण्यात आले होते. यानंतर आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी कार्यभार घेताच सहकाऱ्यांचा परिचय करून घेतला. सायंकाळच्या 7:30 वाजेपर्यंत तहसील कार्यालयात असणाऱ्या विविध विभागात प्रत्यक्षपणे जाऊन विभागाची माहिती जाणून घेतली.गैरहजर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचीही माहिती त्यांनी घेऊन काहींना त्यांनी तंबीही दिली. प्रशासनात ह्या तहसीलदार शिस्तीचे कडक भोक्ते असल्याचा प्रत्यय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पहिल्याच दिवशी आला.

याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी, महसूल, संजय गांधी योजना व पुरवठा नायब तहसीलदार डॉ. राहूल वाघ, निवडणूक नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर आणि डी. बी. जाधव यांच्यासह अन्य कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. अनेकांनी ठस डॉ.राजपूत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या