जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:– जळगाव जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी , अपघात आणि आत्महत्या वाढल्याचे चित्र आहे.लहान भावाला दुकानात पाठवून १७ वर्षीय तरुणीने जुन्या गावात राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.शहरातील विठ्ठलपेठ परिसरात आज दुपारी अडीच-तीनच्या सुमारास ही घटना घडली. ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहरातील विठ्ठलपेठ परिसरात ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी ही तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होती. शहरातील का.ऊखाजी कोल्हे येथे ती अकरावीचे शिक्षण घेत होती. दरम्यान आज शुक्रवार, १३ रोजी सकाळी तिची आई या नातेवाईकांकडे शिरपूर येथे गेले होत्या, तर वडील हे शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते.त्यावेळी दुपारी ट्विंकल ही लहान भाऊ दीपक याच्यासोबत घरीच होती. दुपारी अडीच वाजता लहान भावाला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठवले होते. थोड्यावेळाने लहान दीपक घरी आल्यावर बहिणीने गळफास घेतल्याचे दिसून आले.तातडीने आरडाओरड करत नातेवाईकांना आणि शेजारच्यांना बोलवले. शेजारी राहणाऱ्यांनी तिला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणी अंती मृत घोषित केले.
शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. तिच्या पश्चात वडी, आई, लहान भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.