Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमटेम्पोचालकाची व्यापायाला मारहाण

टेम्पोचालकाची व्यापायाला मारहाण

नशिराबाद/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- देवी विसर्जन मिरवणुकीसाठी नंदुरबारहून येणारे ढोलपथक टेम्पोतून नशिराबाद येथे नेण्यासाठी व्यापाऱ्याने नकार दिल्याने नशिराबाद येथीलच टेम्पो चालकासह दोघांनी व्यापाऱ्याला मारहाण करत त्यांची तीन तोळ्याची सोन्याची चेन लंपास केल्याची घटना जळगाव रेल्वेस्थानकाबाहेर बुधवारी रात्री १ वा. दरम्यान घडली. घटना स्थळावरून दोघे संशयित पसार झाले असून, याबाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी व्यापाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वृत्त असे की, बुधवारी रात्री विसर्जन मिरवणुकीसाठी नंदुरबारहून रेल्वेने येणाऱ्या ढोलपथकाला नशिराबाद येथील व्यापारी भूषण हिरालाल चौधरी (वय ३१) हे त्यांना नशिराबादला नेण्यासाठी जळगाव रेल्वेस्थानकावर आले होते. यावेळी त्यांच्या गावातील नशिराबाद येथील टेम्पो चालक चेतन दिलीप येवले व अविनाश विजय रंधे तेथे आले. त्यांनी ढोलपथक टेम्पोमधून नेऊ असे सांगितले. त्याला भूषण यांनी नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला व वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. चेतन व अविनाश यांनी भूषण यांना जबर मारहाण केली आणि ते ३ तोळ्याची सोन्याची चेन घेऊन पळून गेल्याची तक्रार व्यापाऱ्याने शहर पोलिसांत दिली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या