Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeजळगाव११ जून रोजी ‘स्ट्रॉबेरी मून’! जळगावच्या आकाशात दुर्मिळ खगोलीय दृश्य

११ जून रोजी ‘स्ट्रॉबेरी मून’! जळगावच्या आकाशात दुर्मिळ खगोलीय दृश्य

जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- ११ जून रोजी रात्री जळगाव जिल्ह्यातील आकाशात एक अत्यंत दुर्मिळ आणि आकर्षक खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. या दिवशी आकाशात दिसणारा पूर्ण चंद्र, ज्याला ‘स्ट्रॉबेरी मून’ असे म्हणतात, तो चंद्र गेल्या जवळपास २० वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर उगम पावणार आहे.

हा दुर्मिळ योग ‘मेजर लूनर स्टँडस्टिल’ या खगोलीय स्थितीमुळे घडतो, जी दर १८.६ वर्षांनी एकदा घडते. यामुळे चंद्राच्या उगम आणि अस्ताचे बिंदू सामान्यपेक्षा अधिक उत्तर व दक्षिण दिशांकडे झुकतात. यावेळी चंद्र पृथ्वीच्या कक्षेत सर्वात झुकलेल्या कोनात असतो. त्यामुळे या चंद्राचे दर्शन खूप कमी उंचीवर होते, जे पाहणे एक अद्वितीय अनुभव ठरतो.

या संधीचं महत्त्व लक्षात घेता, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक (DCF) यांच्या पुढाकाराने ‘डार्क स्काय’ धोरणांतर्गत आकाश निरीक्षणासाठी विशेष व्यासपीठ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात निसर्गदर्शनाबरोबरच खगोलशास्त्रप्रेमींसाठीही अभ्यासाचा नवा मार्ग खुले होईल.

या घटनेचे दर्शन रात्रीच्या वेळेत स्पष्टपणे होणार असून, पुढच्यांदा अशी संधी २०४३ मध्येच मिळेल, अशी माहिती खगोल अभ्यासकांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या आकाशाकडे नजर ठेवावी आणि या दुर्मिळ चंद्रदर्शनाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या