जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात मुलींच्या अत्याचारात खूप वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील एका १९ वर्षीय तरुणी घराजवळील किराणा दुकानात गेली असता तिला एका ३० वर्षीय व्यक्तीने दुकानाजवळ चुकीचे वर्तन केल्याप्रकरणी एका विरोधात मुलीच्या तक्रारीनुसार नशिराबाद पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या घटनेची चर्चा परिसरात होत आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद या गावात १९ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे.दि.२ नोव्हेबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तरुणीच्या आईने दुकानातून सामान घेण्यासाठी पाठविले.तरुणी दुकानात जात असतांना याच परिसरातील एका ३० वर्षीय व्यक्तीने दुकानाजवळ असतांना तरुणीसोबत चुकीचे वर्तन केले.आणि तिला म्हणाला की,” तू मला खूप आवडते यावर तुझे म्हणणे काय ” ? तर तरुणीने त्याला धक्का देत ‘ मी तुझे नाव माझ्या परिवाराला सांगते ‘असे म्हणाली असता त्याने तरुणीला ‘ घरी जर सांगितले तर तुझ्या परिवाराला मारून टाकेल ‘, अशी धमकी देखील यावेळी दिली. त्यानंतर तरुणीने घरी जावून थेट नशिराबाद पोलिसात धाव घेत ३० वर्षीय व्यक्तीविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण ग्रामीण व शहरी भागात वाढत चालले आहे. दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव हे करीत आहेत.