Monday, September 16, 2024
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रटुरिंग टॉकीज व तंबू मधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत : सुधीर मुनगंटीवार

टुरिंग टॉकीज व तंबू मधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत : सुधीर मुनगंटीवार

मुंबई/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत. या चित्रपट प्रदर्शनादरम्यान शासकीय योजनांच्या जाहिरातींचीही प्रसिद्धी करावी. याबाबत विभागाने तातडीने योग्य पावले उचलावी, अशा सूचना वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. टुरिंग टॉकीज तंबूतील सिनेमांचे जतन व पुनर्वसन या संदर्भात वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मंत्रालयातील परिषद सभागृहात बैठक घेतली. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे, चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्यासह टुरिंग टॉकीजचे मालक व प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, टुरिंग टॉकीज आणि तंबूमधून ऐतिहासिक दाखविल्यास थोर महापुरुषांचे विचार व कार्य घराघरात पोहोचेल. या चित्रपट प्रसारण प्रसंगी शासकीय योजनांच्या जाहिरातीही दाखविल्यास शासकीय योजना ही तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. जाहिरात प्रसारणामुळे टुरिंग टॉकीज व तंबू मलकाना आर्थिक मदतही मिळेल. टुरिंग टॉकीज व तंबू मालकांना देण्यात येणारे भांडवली अनुदान एक रक्कमी देण्याबाबत मंत्री मुनगंटीवार यांनी सूचना केल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या