Saturday, September 14, 2024
police dakshta logo
Homeजळगावउडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र जळगांव येथे पर्यावरण पूरक गणपती कार्यशाळा संपन्न

उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र जळगांव येथे पर्यावरण पूरक गणपती कार्यशाळा संपन्न

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- रूशिल मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्याग प्रशिक्षण केंद्र, जळगांव येथे दीव्यांग मुलांसाठी शाळू मातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..👇👇

या कार्यशाळेत मुलांना नीम, चिंच यांच्या बियाचे रोपण करून दिव्यांग मुलांना शाळू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच याच्या अनुषंगाने त्यांच्यात मोटर स्किल डेव्हलपमेंट मध्ये खूप मदत होते. एकंदरीत या पर्यावरण पूरक गणपती प्रशिक्षणातून मुलांचा सर्वांगीण विकास तर होईलच परंतु यात प्रामुख्याने झाडें लावा झाडें जगवा ही संकल्पना राबविण्यात आल्याने, दिव्यांग मुलांकडून समाजाला एक सुरेख असा संदेश दिला जाईल. या कार्यशाळेत यावेळी संस्थेच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांच्या उपस्थितीत हेतल पाटील, जयश्री पटेल, ज्योती रोटे यांचे मुलांना मार्गदर्शन लाभले. तसेच महेंद्र पाटील, रितेश भारंबे यांनी कार्यशाळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या