Tuesday, January 28, 2025
police dakshta logo
Homeजळगावखा.उन्मेष पाटील यांनी भाजपाला राम..राम.. करीत, शिवसेना (ऊबाठा) मध्ये केला पक्षप्रवेश...!

खा.उन्मेष पाटील यांनी भाजपाला राम..राम.. करीत, शिवसेना (ऊबाठा) मध्ये केला पक्षप्रवेश…!

मुंबई/पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे तिकीट कापले गेल्या कारणाने खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह तसेच पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या सोबत आज रोजी शिवसेना-(ऊबाठा) पक्षात प्रवेश केल्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

नुकतेच जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकिट कापून त्यांच्या जागी स्मीता वाघ यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. उन्मेष पाटील यांची कामगिरी चांगली असतांना त्यांचे तिकिट कापल्याने जळगावात चर्चेला उधाण आले होते. उन्मेष पाटील यांनी स्वतः आपल्याला पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ते उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसले नाहीत. पक्षातील अंतर्गत वादातून उन्मेषदादांचा डावलण्यात आल्याची चर्चा जनमानसात होतांना दिसत आहे. शिवसेना-(ऊबाठा) पक्षाकडून त्यांच्या सौभाग्यवती संपदाताई पाटील यांना किंवा त्यांना स्वतः उमेदवारी मिळेल असे मानले जात आहे.

कालपासून अश्या घडल्या नाट्यमय घडामोडी

मंगळवारी दुपारी मातोश्रीवर खासदार उन्मेष पाटील हे आपल्या समर्थकांसह दाखल झाल्याने त्यांचा (ऊबाठा) मध्ये पक्षप्रवेश हा निश्चित मानला जात होता. प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारले असता त्यांनी माझे खासदार संजय राऊत यांच्याशी मैत्री पूर्ण संबंध असून यासाठीच आपण मातोश्रीवर आले असल्याची माहिती दिली. संजय राऊत यांनी मात्र उन्मेष पाटील हे नाराज असून त्यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून याबाबत आपल्याला उद्यापर्यंत सर्व काही आपल्या समोर असेल असे सांगितले. यानंतर जळगावचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी देखील उन्मेष पाटील यांचा लवकरच (ऊबाठा) मध्ये पक्षप्रवेश होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. तर सुषमा अंधारे यांनी बुधवारी दुपारी साडे बारा वाजता उन्मेष पाटील यांचा पक्षात प्रवेश होणार असल्याचे सोशल मीडियातून जाहिर केले होते.

आज दुपारी उध्दव ठाकरे यांच्या समक्ष झाला उन्मेष पाटील यांचा पक्षप्रवेश

दरम्यान, आज दुपारी उध्दव ठाकरे यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर खासदार उन्मेष पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना आपल्या खासदार पदाचा राजीनामा देऊन, तसेच भारतीय जनता पक्षाचा त्याग करून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. स्वत: उध्दव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार तसेच अन्य सहकार्‍यांनी देखील शिवसेना-उबाठा मध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला जळगाव जिल्ह्यात अनपेक्षितपणे मोठा धक्का बसला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या