जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. अजित पवार यांचे दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी दुःखद निधन झाल्याने राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिनांक 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील वायरलेस संदेश क्र. DIP-2026/CR-20/PROTO-1 दिनांक 28 जानेवारी 2026 नुसार सदर निर्णय घेण्यात आला असून, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या कालावधीत शासकीय इमारतींवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार असून कोणतेही शासकीय समारंभ, मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा उत्सव साजरे करण्यात येणार नाहीत. सदर आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उपक्रम तसेच संबंधित विभागांनी शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्यात शोककळा ; तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर
RELATED ARTICLES

