Tuesday, September 16, 2025
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणअजितदादांच्या वाढदिवसानिमित्त नशिराबाद येथे महाआरोग्य तपासणी शिबिर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त नशिराबाद येथे महाआरोग्य तपासणी शिबिर

रुग्णांची तपासणी, मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुविधांचा लाभ

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.अजितदादा पवार यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त नशिराबाद येथे रविवार, दि. २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय काँग्रेस जनमंगल ग्रामीण नशिराबाद व गोदावरी फाउंडेशन, तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.शिबिरामध्ये विविध वैद्यकीय विभागांतील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, निदान, मोफत उपचार व काही आजारांवर शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असणार आहे.शिबिरात हृदयरोग तपासणी, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, कॅन्सर स्क्रिनिंग, बालरोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, मानसिक आजार, त्वचारोग, नाक-कान-घसा, नेत्ररोग, जनरल मेडिसीन, अशा विविध विभागांची सुविधा दिली जाणार आहे.तसेच, ECG, कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी व मुफ्त एन्जिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रियेची सुविधा देखील दिली जाणार आहे.या शिबिरात ASD/VSD हृदयातील छिद्र न ऑपरेशन करता बंद करणं, यकृत व प्लीहा (Spleen) शस्त्रक्रिया, गर्भाशय, हर्निया, अपेंडिक्स, गाठ व पोटातील विविध आजारांवरील शस्त्रक्रिया, तसेच मानसोपचार विभागामार्फत समुपदेशन या सेवा दिल्या जाणार आहेत.

शिबिराचे उद्घाटन मा. माजी मंत्री तथा आमदार अनिलजी भाईदास पाटील, माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँक चेअरमन संजयजी पवार, कार्याध्यक्ष योगेशजी देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
शिबिराचे संयोजक प्रा. ओंकार चव्हाण व रोहित भानुदास पाटील असून, राहूवादी काँग्रेस पार्टी नशिराबाद-शहराध्यक्ष गणेशभाऊ चव्हाण, आणि सैय्यद बरकत अली यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराचे ठिकाण : उर्दू शाळा क्र.१, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ, नशिराबाद, ता. व जि. जळगाव.
शिबिरासाठी आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड व रेशन कार्ड (ऑरिजनल).

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या