Friday, November 22, 2024
police dakshta logo
Homeजळगाववन्यजीव सप्ताहाअंतर्गत यावल येथे ईगल ग्लोबल फाऊंडेशनचे पर्यावरण प्रेमी व तज्ज्ञांनी केले...

वन्यजीव सप्ताहाअंतर्गत यावल येथे ईगल ग्लोबल फाऊंडेशनचे पर्यावरण प्रेमी व तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

वन संवर्धन व संरक्षण काळाची गरज : तुषार वाघुळदे

यावल/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- वन्यजीव सप्ताहाअंतर्गत यावल येथील वनक्षेत्र कार्यालयाच्या सभागृहात यावल उपवनसंरक्षक जमीर शेखआणि सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या इतिहासात यावल विभागाचे अधिकारी व वनपाल, वनाधिकारी,वन रक्षक ,क्षेत्रीय कर्मचारी यांना ” निसर्ग बोलतो ” या अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून निसर्ग प्रेमी व ईगल ग्लोबल फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास महाजन ( भुसावळ ) जळगाव येथील जेष्ठ पत्रकार, पर्यावरण प्रेमी व ईगल ग्लोबल फाऊंडेशनचे संचालक तुषार वाघुळदे, कासोदा येथील निसर्ग उपचार तज्ज्ञ सुनीता बोरसे ,अतुल इनामदार, यावल वन परिक्षेत्र (पश्चिम ) चे अधिकारी सुनील भिलावे यांची उपस्थिती होती.प्रारंभी त्यांचे स्वागत वन परिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी केले.

निसर्गावर आधारित रोजगार, आदिवासी बांधवांना देऊन वनसंवर्धन, पशुपक्षी संवर्धन वनवा- नवाड वन बंधारे पर्यटन सेंटर असे विविध प्रकारच्या उद्योगाची सखोल माहिती निसर्ग प्रेमी व ईगल ग्लोबल फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास महाजन यांनी उपस्थितांना दिली. जेष्ठ पत्रकार,पर्यावरण प्रेमी व ईगल ग्लोबल फाऊंडेशनचे संचालक तुषार वाघुळदे मार्गदर्शन करताना म्हणाले, सातपुडा जंगल हे नटलेले असून जंगलाची सुरक्षा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. “वनसंवर्धन व संरक्षण काळाची गरज आहे, त्यामुळे वन्यजीव धोक्यात येणार नाही,
परंतू जंगलतोड, वाढते शहरीकरण, पशुपक्ष्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण यांसारख्या बाबींमुळे हल्ली माणसाचा जंगली प्राण्यांशी संबधच येत नाही आणि येतो तेव्हा दोन्ही बाजूंना फारसा आनंददायक नसतो..! पण, अलीकडे मानव आणि वन्यजीवांमध्ये जगण्यातून संघर्ष निर्माण झाला आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याने वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे हे निसर्गचक्र, निसर्गसौंदर्य आणि वैविध्यता कायम राखण्याकरिता वन्यजीव सप्ताहाच्यानिमित्ताने का होईना, मानवाने त्यांच्या संरक्षणाकरिता हातभार लावण्याची गरज आहे , असेही तुषार वाघुळदे यांनी सांगितले.

यावल वन विभाग ( पूर्व ) चे वन परिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी सांगितले की, अलीकडच्या काही वर्षांत वन्यजीवांच्या संरक्षणासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे. आम्ही जंगल वाचवण्यासाठी जनजागृती विविध प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून करत असतो..निसर्ग वाचवण्यासाठी निस्वार्थपणे कार्य करणारी ‘ ईगल ग्लोबल फाऊंडेशन ‘ चे काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.

सातपुडा जंगलातील विविध वन उपज आणि अनेकविध वनौषधी याबद्दल अभ्यासक सुनीता बोरसे यांनी अनमोल मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या