Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यावाहनांच्या पाठीमागे सायकल कॅरिअर लावल्यास कारवाई नाही ; परिवहन विभागाचा निर्णय

वाहनांच्या पाठीमागे सायकल कॅरिअर लावल्यास कारवाई नाही ; परिवहन विभागाचा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- वाहनांच्या पाठीमागे योग्य पद्धतीने बसवलेले सायकल कॅरिआर आता कारवाईपासून मुक्त राहणार आहेत. सायकल कॅरिअरमुळे जर इतर वाहनांना किंवा रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होत नसेल, तर अशा वाहनांवर कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले आहे.

सायकल हा एक पर्यावरणपूरक, आरोग्यदायी आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत सहज पोहोचणारा प्रवासाचा पर्याय असल्याने अनेक नागरिक वाहनांवर सायकल कॅरिअर बसवून त्याचा उपयोग करत असतात. मात्र, यापूर्वी अशा वाहनांवर पोलीस किंवा परिवहन विभागाकडून कारवाई झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांच्या पाठीमागे सायकल वाहून नेण्यासाठी कॅरिअर लावण्यास कोणताही बंदी नाही. त्यामुळे जर अशा कॅरिअरमुळे इतरांना त्रास होत नसेल, वाहन क्रमांक झाकला जात नसेल आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत नसेल, तर कारवाई होऊ नये, असे स्पष्ट करत हा नवा आदेश जारी करण्यात आला आहे.

हा निर्णय सायकलप्रेमी नागरिकांसाठी एक मोठा दिलासा मानला जात असून, पर्यावरण रक्षणाच्या दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या