Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके भेट

विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके भेट

औरंगाबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व लेखन विश्वात नावाजलेले पब्लिकेशन म्हणजे कारभारी भुतेकर यांचे नोबल पब्लिकेशन होय. त्यांच्या पब्लिकेशनच्या माध्यमातून विविध प्रकारची पोलीस भरती, सरळसेवा भरती,वर्ग 3 व 4 साठी पुस्तके प्रकाशित करीत असतात.त्यांचे मेगा सामान्य ज्ञान व 280 मेगा पोलीस भरती नावाचे पुस्तक बाजारात नव्यानेच उपलब्ध झालेले आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होणेसाठी विविध उपक्रम घेणाऱ्या संस्था, कार्यालयात ते पुस्तके भेट देतात. अशीच काही पुस्तके औरंगाबाद येथील पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांचेकडे सुपूर्द करण्यात आलीत. मागील वर्षी चांदवड तालुक्यातील दहिवद या ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना सरांनी 10 हजार रुपयांची पुस्तके भेट दिली होती,त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या