फैजपूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील जे. टी. महाजन पॉलिटेक्निक येथे नुकतीच “उद्योजकता विकास आणि स्टार्टअप” या विषयावर तज्ज्ञ व्याख्यान व कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे येथील वरिष्ठ प्राध्यापक प्रा. राजेश रुपचंद वाघुळदे उपस्थित होते. त्यांना २५ वर्षांहून अधिक शैक्षणिक अनुभव असून संशोधन, पेटंट्स तसेच विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शन क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.कार्यशाळेदरम्यान प्रा. वाघुळदे यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकता, नवकल्पना, स्टार्टअप संधी तसेच उद्योग क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उद्योजकता विकास दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि सर्जनशील विचारसरणीकडे लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेअंतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. तांत्रिक उपक्रमात मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या संघात जयेश बाउसकर, गुंजन पाटील, अनस खान, दिपक पाटील आणि किर्तेश चौधरी यांचा समावेश होता.अतांत्रिक उपक्रमात संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक (रनर-अप) मिळवला. या संघात अश्विनी पाटील, चेतना पाटील, खुशबू तळेले, सुमेधा पाटील आणि मानसी पाटील सहभागी होत्या. या उपक्रमाचे समन्वयक ए. एस. कोळी होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पॉलिटेक्निकचे प्राचार्य पी. एम. राणे होते. यावेळी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. सदर कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.

