जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथील तरुणाचा विहिरीत पोहायला गेला असता बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ३० सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पवन भिका जाधव (वय २३, रा. सुभाषवाडी ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात परिवारासह राहत होता. मिस्त्री काम करून तो उदरनिर्वाह करीत होता.
सविस्तर माहिती अशी की, शनिवारी सकाळी पवन भिका जाधव हा मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी शनिवारी सकाळी तो मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी तो गावातील एका विहिरीजवळ आला. तेथे तो पोहण्यासाठी विहिरीत उतरला असता, तो पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. दरम्यान, गावातील नागरिकांना घटनास्थळी बोलावले.वृत्त कळताच पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही पाचारण केले. त्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला .त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीयम हाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्याने मयत घोषित केले.