Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावसुसरी शिवारात वीज कोसळल्याने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू; गावात पसरली शोककळा

सुसरी शिवारात वीज कोसळल्याने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू; गावात पसरली शोककळा

वरणगाव/ विशेष प्रतिनिधी / पोलीस दक्षता लाईव्ह:-गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. वरणगाव येथून जवळच असलेल्या सुसरी ता. भुसावळ येथील शेत शिवारात दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस बरसला.. त्या दरम्यान शेतातून काम आटोपून घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन महिलांच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत वरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंदकरण्यात आली आहे. तर परिसरातील शेतकरी व मजूर वर्ग पुर्णतः धास्तावलेला आहे. या दुःखद घटनेमुळे सुसरीगाव व मृतक माहिलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

.
या दोन्ही महिलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच शेतशिवारात गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेचा वरणगाव पोलिसांनी पंचनामा करून दोनही मृतदेहांचे वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तर विजांच्या तांडवामुळे परिसरात प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या