नशिराबाद/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद परिसरात आज संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे स्थानिक नागरिकांचे काही ठिकाणी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या जोरदार तडाख्याने २ घरांवरील पत्रे उडून गेले, तर काही झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच नगरपरिषद नशिराबादचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्यावरील झाडे व अडथळे हटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर सुरू होते. प्रशासनाने संबंधित नागरिकांना तात्पुरत्या सुरक्षित स्थळी हलवले असून, कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नगरपरिषद व जिल्हा प्रशासनाकडून पुनर्बांधणीचे कार्य सुरू असून, नागरीकांनी घाबरून न जाता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नशिराबाद नगरपरिषदच्या वतीने करण्यात आले आहे.