Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यावाढदिवसाचा संकल्प पूर्ण करत दुसरे झाड लावत पहिल्या वर्षाच्या लावलेल्या झाडासोबत वाढदिवस...

वाढदिवसाचा संकल्प पूर्ण करत दुसरे झाड लावत पहिल्या वर्षाच्या लावलेल्या झाडासोबत वाढदिवस साजरा….

चांदवड/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- चांदवड शहरांमध्ये श्री.नेमिनाथ जैन येथील शाळेमध्ये पियोष्णी फंगाळ हिने आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी शाळेमध्ये बालगटात असताना तिने तिच्या वाढदिवसा निमित्त पहिले झाड लावले होते. त्या झाडासोबत आपला वाढदिवस साजरा केला. व यावेळेस आज दुसरे झाड लावले. आणि प्रत्येक वर्षी एक नवीन झाड शैक्षणिक संस्थेत लावण्याचा जो संकल्प केला होता त्या प्रमाणे आज दुसरे झाड देखील लावत मुलांना चॉकलेट देऊन आपला वाढदिवस आपल्या वर्ग मित्र-मैत्रिणींसोबत साजरा केला.

तसेच आपल्याला आजपासूनच वेळेचे नियोजन कसे करता येईल व खेळण्या-बागडण्यासाठी कसा वेळ उपलब्ध होतो. या उद्देशाने सर किती वाजले हे विचारण्यापेक्षा घड्याळच समजून घेऊ या विचाराधीन आपल्या घरातील आई-वडिलांना सांगत आम्हाला शाळेत वेळ समजण्यासाठी एक घड्याळ भिंतीवर लावून द्या असे सांगत आई-वडिलांच्या माध्यमातून शाळेमध्ये भिंतीवरील घड्याळ देखील सप्रेम भेट दिले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदीप ललवाणी शाळेचे वर्गशिक्षक मृणाल जाधव, इतर शिक्षक , बापू गांगुर्डे, मुलीचे आई-वडील सोनल फंगाळ, नितीन फंगाळ,भाऊ लव्यांश फंगाळ, इतर मित्र- मैत्रिणी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या