Sunday, April 12, 2026
police dakshta logo
Homeजळगाववाघ नगरात मोफत नेत्र व महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; महात्मा फुले व...

वाघ नगरात मोफत नेत्र व महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रम

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सारा फाउंडेशन व भीमकन्या ग्रुप, जिजाऊ नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रोहिदास मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिरात जळगाव येथील वाघ नगर, जिजाऊ नगर, कोल्हे हिल्स तसेच हरिविठ्ठल नगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत नेत्र व सर्वसाधारण आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

श्री चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने आयोजित या उपक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच रुग्णांना मोफत होमिओपॅथी औषधांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी आमदार राजुमामा भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक अनिल अडकमोल व भूषण लाडवंजारी, सारा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत भालेराव, उपाध्यक्षा सौ. सुरेखा भालेराव, डॉ. सागर भालेराव तसेच जयसिंग वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.आमदार भोळे यांनी जयंतीनिमित्त आरोग्य शिबिरासारखा सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करत डॉक्टरांच्या टीमचा पुस्तक देऊन सत्कार केला. त्यांनी महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या मानवकल्याणासाठीच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉ. जयेश वाल्हे, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव, डॉ. स्वाती सोनवणे व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सेवा दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष पी. ई. तात्या पाटील, सचिव राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग व रुग्णालय अधीक्षक डॉ. नरेंद्र शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वांद्रे सर यांनी केले. विविध मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या