Friday, November 22, 2024
police dakshta logo
Homeजळगाववाळू आणि गौण खनिज वाहतूक प्रकरणी दोन तस्करांच्या मालमत्तेवर तहसीलदार यांनी लावला...

वाळू आणि गौण खनिज वाहतूक प्रकरणी दोन तस्करांच्या मालमत्तेवर तहसीलदार यांनी लावला बोजा

वाळू तस्करांच्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया २३ जानेवारी रोजी

दोन्ही वाळू व गौण खनिज तस्कर बांभोरीचे

धरणगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- धरणगाव तालुक्यात तहसीलदार यांनी बेकायदेशीररित्या वाळू आणि गौण खनिज तस्करी केल्याप्रकरणी दोन जणांच्या मालमत्तेवर बोजा बसविला आहे. २३ जानेवारी रोजी दुपारी या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बांभोरी गावातील पवन खंडू नन्नवरे आणि ज्ञानेश्वर राजू सपकाळे या दोघांनी मिळून धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळील गिरणा नदी पात्रातून बेसुमार अवैधरित्या वाळूची आणि गौण खनिजाची वाहतूक केली होती. ही अवैध वाहतूक असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्यातर्फे या दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान पवन ननवरे याला २ लाख ४१ हजार तर ज्ञानेश्वर सपकाळे याला २ लाख ६२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.

मुदत संपूनही मुदती दरम्यान दोघांनी दंडाची रक्कम अद्याप जमा केली नव्हती, त्यामुळे तहसीलदार यांनी पुढील कारवाई करीत त्यांच्या मालमत्तेवर बोजा बसविलेला असून. त्या बोजा बसवलेल्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया २३ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता तहसील कार्यालयात होणार आहे.या लीलावा दरम्यान येणाऱ्या रकमेतून दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकांन्वये तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या