Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईममहामार्गावर जबरी लुट करणारे दोघे गुन्हेगार ताब्यात

महामार्गावर जबरी लुट करणारे दोघे गुन्हेगार ताब्यात

यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- यावल तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी घडलेल्या जबरी चोरी प्रकरणातील सराईत गुन्हेगारासह एकाला यावल पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षे धंदा ड्रायव्हर मुळ रा. चोपडा हे त्यांचे ताब्यातील महींद्रा पिकअप मालवाहतूक गाडीतून रावेर ते चोपडा हायवेने जात असताना दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्री यावल शहरातील बुरुज चौकातील ब-हाणपुर जलेबी सेंटरसमोर दोन अनोळखी इसमांनी त्यांचे वाहन थांबवले. त्यानंतर वाहनातील डॅशबोर्ड डिक्कीत ठेवलेली रुपये 5,000/- रोख रक्कम व कागदपत्रांची पिशवी जबरदस्तीने काढून घेतली तसेच तक्रारदारास चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणी यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

गोपनीय माहिती व स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीने पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणातील आरोपी समशेर शहा सलीम शहा (वय 27, रा. बाहेरपुरा, यावल, मुळ रा. पंचशीलनगर, भुसावळ) व त्याचा साथीदार समीर रहमान तडवी (वय 22, रा. तडवी कॉलनी, यावल) असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी क्र. 1 समशेर शहा यास गेंदालाल मिल, जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले तर आरोपी क्र. 2 समीर तडवी यास यावल येथून अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली 5,000/- रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. यातील आरोपी समशेर शहा सलीम शहा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे, तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ येथे जबरी चोरी, घरफोडी, विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली स. फौजदार विजय पाचपोळे, पोहेका वासुदेव मराठे, पोहेका निलेश चौधरी, पोना अमित तडवी, पोका अर्षद गवळी, पोकों ऐजाज गवळी, पोकों अनिल साळुंखे व पोका सागर कोळी यांनी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या